Beed, जानेवारी 30 -- Ajit Pawar in Beed : उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीड दौऱ्यावर आहेत. त्यांचे धनंजय मुंडेसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत भाषण करत कार्यकर्त्यांना सुनावले तसेच व्यथा देखील व्यक्त केली.

अजित पवार म्हणाले, सत्ता आल्यानंतर अनेक हौशे-गवशे मला येऊन भेटत आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हे लोक दुसऱ्या पक्षात होते. आता मात्र, मला येऊन म्हणतात की, दादा मी तुमच्यासोबत आहे. हे असं चालणार नाही. उद्या परत कोणी माझ्याकडे आलं आणि एवढ्यावेळेला पांघरुण घाला, असे म्हटलं तर चालणार नाही. तुमच्या चुका पोटात घेऊन माझं पांघरुण फाटून गेलंय. एवढ्यावेळेस तुम्हाला पदरात घेऊन आता माझा पदरच उरलेला नाही, असे देखील अजित पवार म्हणाले....