Mumbai, फेब्रुवारी 9 -- जगातील प्रत्येक व्यक्तीला काहीतरी छंद असतोच मात्रकामाच्या जबाबदारीतून प्रत्येकाला छंद जोपासता येत नाही. कामाच्या तासांमुळे एखाद्याच्या आयुष्यात उदासीनता येते व त्याचा जीवनातील छोट्या छोट्या सुखात आनंद घेण्यामध्येही रस दिसून येत नाही. तुमचे काम केवळ उपजीविकेचे साधन बनू शकते. मात्र तुमची नोकरी आणि तुमची आवड या दोन्हींचा समतोल साधता आला तर?

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक ऑटो-रिक्षा चालक आपले काम करताना उत्कटतेने एक मधुर गाणे गात आहे. या व्हिडिओवर नेटीझन्सनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केलेल्या या क्लिपच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "KARAOKE AUTO AT JUHU, Mumbai." व्हिडीओमध्ये दिसते की, रिक्षाचालक ट्रॅफिकमध्ये अडकला असून रिक्षात असलेल्या माईक...