भारत, एप्रिल 27 -- सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. या व्हिडीओंमुळे अनेकांचे रातोरात आयुष्य बदलून जाते. काही प्रसिद्धीचा शिखरावर पोहोचतात तर काहींच्या करिअरला एक वेगळी ओळख मिळते. असेच काहीचे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'आमच्या पप्पांनी गंपती आणला' गाण्यातील चिमुकल्या साईराज केंद्रचे झाले आहे. या चिमुकल्या मुलाचे हे गाणे सोशल मीडियावर तुफान हिट ठरले होते. आता त्याला एका मालिकेची ऑफर मिळाली आहे. आता ही मालिका कोणती असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

'आमच्या पप्पांनी गणपती आणला' हे मूळ गाणे माऊली घोरपडे आणि शौर्या घोरपडे या दोन भावंडांनी गायले आहे. गाण्याची चर्चा तर झालीच. पण गाण्यावर डान्स करणाऱ्या साईराज केंद्रेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. साईराजचे गोंडस व निरागस हावभाव पाहून सर्वजण चकीत झाले. आता सा...