Pune, फेब्रुवारी 10 -- Amazon workers Protest : पुण्यात आणि मुंबईत ॲमेझॉनच्या घरपोच डिलिव्हिरीला आता विलंब होऊ शकतो. कारण कंपनीच्या गोदामतील कामगार हे संपववर गेले आहेत. कंपनीने या कामगारांसोबत ३ महिन्यांपूर्वी माथाडी पद्धतीने या कामगारांना लाभ मिळावेत, असा करार केला होता. याला तीन महीने होऊनही हा करार पाळला गेला नाही. यामुळे कामगारांनी आज पासून (दि १०) काम बंद आंदोलनास सुरुवात केली आहे.

सध्या ऑनलाइन शॉपिंग करण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: ॲमेझॉनवरून ऑर्डर करण्याचे प्रमाण जास्त आहे. कामगारांच्या या संपाचा परिणाम डिलिव्हरीवर होणार आहे. हे आंदोलन हमाल पंचायतीच्या वतीने केले जाणार आहे. ॲमेझॉनची कंत्राटदार कंपनी वैशाली ट्रान्सकॅरिअर्सच्या माध्यमातून गोदामांमध्ये कामगार काम करतात. त्या कामगारांना ४ वर्षांपासून कमी वेतन दिलं जात असून त्यांना ...