Bihar, फेब्रुवारी 14 -- बिहारमधील मुंगेरमधून एक बातमी समोर आली आहे, जिथे पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पतीने आत्महत्या केली. शबे बरातच्या रात्री दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि शुक्रवारी सकाळी पतीने आपले जीवन संपवले. या दोघांना पाच मुले आहेत, मात्र पत्नीचे गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

गाडी चालवताना लॅपटॉपवर काम करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ठोठावला दंड, व्हिडिओ व्हायरल

कासिम बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हजरतगंज बार गल्ली नंबर ९ मध्ये ही घटना घडली. हे कुटुंब भाड्याच्या घरात राहत होते. मोहम्मद अरमान (३५) असे मृताचे नाव आहे. त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी पाच मुलांची आई आहे. पण तिचे एका पुरुषासोबत अनैतिक संबंध होते. शबे बारातच्य...