New delhi, मार्च 25 -- ईदपूर्वी भारतीय जनता पक्षाने गरीब मुस्लिमांना भेटवस्तू वाटण्याची मोहीम सुरू केली आहे. अल्पसंख्याक 'सौगत-ए-मोदी' अभियान राबवून भाजप ३२ लाख गरीब मुस्लिमांना भेटवस्तू देणार आहे. मंगळवारी दिल्लीतील निजामुद्दीन येथून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा या मोहिमेवर देखरेख ठेवणार आहेत. गरीब मुस्लिमांना अभिमानाने ईद साजरी करता यावी यासाठी त्यांना एक किट ही भेट देण्यात येणार असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

भाजपच्या ३२ हजार कार्यकर्त्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता मशिदीची जबाबदारी घेईल. अशा प्रकारे देशभरातील ३२ हजार मशिदींचा समावेश करण्यात येणार आहे. यानंतर गरीब मुस्लिमांना ईदपूर्वी भेटवस्तू दिल्या जातील. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी म्हणाले की...