Mumbai, मार्च 18 -- मुघल शासक औरंगजेब आणि त्याच्या कबरीवरून महाराष्ट्रात राजकीय गदारोळ माजला आहे. औरंगजेबाची कबर हटविण्याच्या वादातून सोमवारी नागपुरात दोन समाजांमध्ये हिंसक हाणामारी, तोडफोड आणि जाळपोळ झाली. बजरंग दलासह अनेक गट औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी निदर्शने करत होते, त्यावेळी दोन्ही समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाला. या घटनेनंतर राज्यातील राजकारण शिगेला पोहोचले आहे. ३०० वर्षांपूर्वी मरण पावलेल्या व्यक्तीवर अशा राजकारणाचा काय उपयोग, असा टोला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

मात्र भाजप सरकारला ३०० वर्षे जुन्या औरंगजेबाची कबर हटवायची असेल तर ती हटवलीच पाहिजे, पण त्या समारंभाला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नितीशकुमार या आपल्या दोन सहकाऱ्यांना निमंत्रित केले पा...