Mumbai, एप्रिल 15 -- Oat-Zempic Weight Loss Diet: बदलेल्या खाण्यापिण्याच्या बदलेल्या सवयी, राहणीमानातील सवयी यामुळे वाढणाऱ्या वजनाची समस्या अनेकांना जाणवत आहे. पण फिट राहण्यासाठी आणि दिसण्यासाठी आजकाल लोक वजन कमी करण्यासाठी काहीही करायला तयार असतात. विशेषत: कमी वेळेत वजन कमी करण्याची अनेकांची इच्छा असते. या इच्छेपोटी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या डाएट प्लॅनचा अवलंब करत आहेत. सध्या सोशल मीडियावर ओट-झेम्पिक नावाचा एक खास आहार योजना व्हायरल होत आहे. Oat-Zempic हा लठ्ठपणा कमी करणारा ट्रेंड सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामध्ये दावा केला जात आहे की ओट्समध्ये काही गोष्टी मिसळून खाल्ल्याने अनेक किलो वजन कमी होऊ शकते.

Oat-Zempic नावाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या आहारात १ कप पाण्यात सुमारे अर्धा कप रोल केलेले ओट्स मिसळा. त्यात अर्ध्या लिंबाचा रस ...