Mumbai, जानेवारी 30 -- Rule Changes From 1 February : १ फेब्रुवारीपासून नवीन महिना सुरू होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याच दिवशी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याच दिवसापासून काही नवे आर्थिक बदल होणार असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. पुढील महिन्यापासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीपासून यूपीआयशी संबंधित नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे.

पुढील महिन्यापासून कोणते मोठे बदल होणार आहेत ते जाणून घेऊया...

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला देशभरात एलपीजीच्या सुधारीत किंमती जाहीर केल्या जातात. तेल विपणन कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किंमती अद्ययावत करतात. त्यामुळं अर्थसंकल्पाच्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात होणार की वाढ होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिलिंडरच्या किमतीतील बदलाचा परिणाम सर्वसाम...