New Delhi, फेब्रुवारी 12 -- Who is Sajjan Kumar : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये दिल्लीत उसळलेल्या शीख विरोधी दंगलीतील दुहेरी हत्याकांडाच्या प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दिल्ली कोर्टानं दोषी ठरवलं आहे. बचाव पक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय १८ फेब्रुवारी रोजी शिक्षेची घोषणा करणार आहे.

न्यायालयाच्या या निर्णयामुळं पुन्हा एकदा १९८४ च्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. हत्याकांडात दोषी ठरलेले सज्जन कुमार नेमके आहेत कोण? दंगलीत त्यांची काय भूमिका होती? सध्या ते कुठं आहेत? जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तरं.

सज्जन कुमार हे काँग्रेसचे माजी खासदार आहेत. ते काँग्रेसतर्फे लोकसभेत तीन वेळा निवडून गेले होते. दिल्ली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं होतं. डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या दंग...