Mumbai, फेब्रुवारी 4 -- उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय खेळांमध्ये १५ वर्षीय नेमबाज जोनाथन अँथनी याने खळबळ उडवून दिली आहे. कर्नाटकच्या जोनाथन अँथनीने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताचा ऑलिम्पियन सरबज्योत सिंग आणि राष्ट्रीय विक्रम धारक नेमबाज सौरभ चौधरी यांचा पराभव करून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मोठा कारनामा केला आहे.

सरबोजत सिंगने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरसोबत मिळून १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारताला कांस्यपदक जिंकून दिले होते.

मात्र, ऑलिम्पिक हिरो सरबजोतला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत १५ वर्षीय जोनाथनविरुद्ध टिकाव धरता आला नाही. अशाप्रकारे सुवर्णपदक जिंकून जोनाथनने चमत्कार केला. जोनाथनने १० मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत २४०.७ गुणांसह सुवर्णपदक जिंकले.

जोनाथननंतर रवींद्र सिंगने २४०.३ गुणांसह र...