भारत, ऑगस्ट 8 -- दिल्लीच्या भोगल भागात पार्किंगच्या किरकोळ वादाला हिंसक वळण लागलं आणि त्यात बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी याला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर हत्येमागे जातीय कारण असल्याचे वृत्त समोर आले होते. दिल्ली पोलिसांनी मात्र शेजाऱ्यांमधील वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याचा दावा केला असून जातीय आरोप फेटाळून लावले आहेत.

काय होती संपूर्ण घटना?

७ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास आसिफ कुरेशी (वय ४२, रा. भोगल, जंगपुरा) यांचे पार्किंगवरून शेजाऱ्यांशी भांडण झाले. शेजारी उज्वल यांनी आपली स्कूटी आसिफच्या घरासमोर उभी केली होती, ज्याला आसिफने विरोध केला होता. हे प्रकरण इतकं वाढलं की उज्ज्वलचा भाऊ गौतमही तिथे आला. रागाच्या भरात एका भावाने आसिफवर धारदार शस्त्राने (पोकर) हल्ला केला. या हल्ल्यात आसिफच्या छातीला गं...