Mumbai, फेब्रुवारी 11 -- MSEDCL : कृषीपंपांसाठी सौर ऊर्जा खरेदी करण्याकडं महावितरणचा कल असून, येत्या २०२६ पर्यंत महाराष्ट्रातील १०० टक्के सिंचन हे केवळ हरित ऊर्जेवर होईल, असा विश्वास महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील वीज क्षेत्रासाठी महावितरणच्या योजनांची माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिली. त्यानुसार, मार्च २०२६ पर्यंत राज्यातील कृषी पंपांची विजेची संपूर्ण मागणी सौर ऊर्जा निर्मितीद्वारे पूर्ण केली जाईल. त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत (एमएसकेव्हीवाय २.०) १६ हजार मेगावॅट क्षमतेची कंत्राटं विविध कंपन्यांना देण्यात आली आहेत. यामुळं सिंचनासाठी १०० टक्के हरित ऊर्जेचा पुरवठा करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरणार आहे. महावितरणनं आपला दरप...