Pahalgam, एप्रिल 25 -- Mohan Bhagwat On pahalgam attack : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, सध्याचा संघर्ष हा केवळ कोणत्याही संप्रदाय किंवा धर्माच्या नावावर नसून धर्म आणि अधर्म यांच्यात आहे. धर्माच्या आधारे लोकांची हत्या करणारे धर्मांध असून असे वर्तन हे राक्षसी प्रवृत्तीचे लक्षण आहे, असेही ते म्हणाले. दहशतवादाविरोधात कारवाई करण्यावर भर देताना संघप्रमुख म्हणाले, 'आमच्यात ताकद असेल तर ती दाखवावी लागेल.

ही लढाई संप्रदाय किंवा धर्मयांच्यात नाही. त्याचा आधार धर्म आणि संप्रदाय नक्कीच आहे, पण प्रत्यक्षात तो धर्म आणि अधर्म यांच्यातील लढाई आहे. ते पुढे म्हणाले की, "भारतीय सैनिक किंवा नागरिकांनी धर्माच्या आधारावर कधीही कोणाची हत्या केली नाही. हिंदू कधीही धर्माच्या आधारावर मारत नाहीत. धर्मामुळे लोकांची हत्या करणारे धर्मांध...