Chennai, फेब्रुवारी 27 -- तामिळनाडूत हिंदी विरुद्ध तमिळ अशी लढाई लढणारे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. आता तामिळनाडूवर हिंदी लादण्याला आमचा विरोध असेल, असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. हिंदीमुळे उत्तर भारतातील २५ हून अधिक भाषा नष्ट झाल्या, असेही ते म्हणाले. तामिळनाडू हिंदी भाषा लादू देणार नाही आणि तमिळ आणि तेथील संस्कृतीचे रक्षण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात ते म्हणाले की, आम्ही हिंदी लादण्यास विरोध करू. हिंदी मुखवटा आहे, संस्कृत छुपा चेहरा आहे. केंद्र सरकार राष्ट्रीय शिक्षण धोरणात (एनईपी) त्रिभाषा सूत्राद्वारे हिंदी लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप द्रमुकने केला आहे. मात्र केंद्र सरकारने हा आरोप फेटाळून लावला आहे.

बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात ब...