भारत, फेब्रुवारी 20 -- जगातील अनेक देशांमध्ये फाशीच्या शिक्षेच्या वैधतेवर आणि नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. दरम्यान, इराणने गेल्या वर्षी शेकडो लोकांना फाशी दिली होती. इराणमध्ये गेल्या वर्षी फाशीच्या शिक्षेचा वापर करून किमान ९७५ जणांना मृत्यूदंड देण्यात आला. अशी माहिती मानवाधिकार संघटनांनी गुरुवारी दिली. नॉर्वे स्थित इराण मानवाधिकार (आयएचआर) आणि फ्रान्सच्या टुगेदर अगेन्स्ट द डेथ पेनल्टी (ईसीपीएम) यांनी म्हटले आहे की आयएचआरने २००८ मध्ये डेटा गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केल्यापासून हा आकडा सर्वाधिक आहे.

या अहवालानुसार, "इराणमध्ये २०२४ मध्ये फाशीच्या शिक्षेच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे. इराणमध्ये फाशीच्या शिक्षेचा वापर राजकीय छळाचे हत्यार म्हणून केला जात आहे. आयएचआरचे संचालक महमूद अमिरी-मोगद्दम म्हणाले, इराण सरकारने सत्ते...