Mumbai, फेब्रुवारी 27 -- पौर्णिमेचा फेरा या वेबसिरीजच्या यशानंतर शुभम प्रोडक्शन घेऊन आले आहेत मैत्रीचं धम्माल गाणं "पोर बदनाम". हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं असून विशेष म्हणजे या गाण्याने प्रदर्शित होताच अवघ्या ८ तासात १ मिलीयनचा टप्पा पार केला आहे. तसेच या गाण्यावर अनेक प्रेक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून रील्स देखील बनवत आहेत. या गाण्यात महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता निखिल बने, मंदार मांडवकर आणि सिद्धेश नागवेकर हे प्रमुख कलाकार आहेत. तर सुप्रसिद्ध गायक चैतन्य देवढेने त्याच्या सुरेल आवाजात हे गाणं गायलं आहे.

"पोर बदनाम" हे गाणं शुभम प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार झाले असून या गाण्याची निर्मिती पायल गणेश कदम आणि गणेश दिनकर कदम यांनी केली आहे. तर सचिन आंबात यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. या गाण्याचे बोल अनिरूद्ध निमकर याने...