Mumbai, फेब्रुवारी 3 -- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल सर्वांनाच अनपेक्षित असे लागले आहेत. निकालानंतर राज्यात मोठ्या मताधिक्याने महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. पण या निकालावर अनेकांनी संशय व्यक्त केली आहे. विरोधकांनी ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाला सातत्याने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या पार्श्वभूमीवर वंजितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उच्च न्यायालयात ईव्हीएम विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाकडून केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात आली असून मतदानाच्य़ा दिवशी शेवटच्या काही तासात वाढलेल्या मतांच्या टक्क्याचा खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

वंचित आघाडीचे प्रमुख आणि अॅड प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेची हायक...