लखनऊ, फेब्रुवारी 16 -- lucknow double murder : उत्तर प्रदेशातील मोहनलालगंजमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. एका तरुणाने आपल्या आई-वडिलांना हातोड्याने वार करून निर्घृण हत्या केली आहे. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून आरोपी मुलाचा शोध सुरू आहे. मालमत्तेच्या वादातून मुलाने मुलाने आपल्याच आई वडिलांची हत्या केल्याचं उघड झालं आहे.

लखनऊच्या मोहनलालगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरौली गावात ही घटना घडली आहे. जगदीश वर्मा (वय ७०) आणि त्यांची पत्नी शिवप्यारी (वय ६८) हे त्यांच्या गावात राहत होते. त्यांना दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे नाव बृश्कीत उर्फ लाला आणि धाकट्या मुलाचे नाव देवदत्त आहे. जगदीश वर्मा हे व्यवसायाने लोहार होते. असे सांगितले जात आहे की, त्यांचा मोठा मुलगा बृश्कीत याच्यासोबत मालमत्तेवर...