Faridabad, मार्च 27 -- फरिदाबादमधील मोकाट जनावरांची समस्या आता रस्त्यावरून बेडरूमपर्यंत पोहोचली आहे. फरिदाबादमधील डबुआ कॉलनीतील सी ब्लॉकमधील एका घराच्या बेडरूममध्ये बुधवारी गाय आणि बैल घुसले. यामुळे खोलीत उपस्थित असलेल्या एका महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाला. जीव वाचवण्यासाठी महिलने तब्बल २ तास स्वत:ला कपाटात बंद करून ठेवले.

माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेत कुत्र्याच्या मदतीने दोन्ही जनावरांना पळवून लावले. या घटनेनंतर रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांबाबत स्थानिकांनी संताप व्यक्त केला. मिळालेल्या माहितीनुसार, राकेश साहू हे कुटुंबासह सी-ब्लॉकमध्ये राहतात. त्यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास त्याची पत्नी सपना पूजा करत होती.

माझी आई किराणा सामान घेण्यासाठी दुकानात गेली होती. मुले मावशीच्या घरी भेटायला गेली होती. याव...