भारत, फेब्रुवारी 27 -- Pune Swargate bus depot crime: पुण्यातील सर्वाधिक गजबजलेल्या स्वारगेट बस स्थानकात बुधवारी पहाटे शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेतील आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे. दत्ता गाडे असे आरोपीचे नाव असून या घटनेला ४८ तास उलटून देखील आरोपी गाडे याने पोलिसांना गुंगारा दिला आहे.

पुणे स्वारगेट बसस्थानकात एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यात महिलांवरील वस्त्या अत्याचारामुळे महिलांसाठी पुणे खरच सुरक्षित आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. आरोपी दत्ता गाडेचा पोलिस शोध घेत आहेत. मात्र अद्याप तो पोलिसांना सापडलेला नाही.

आरोपी दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. दत्ता गाडे हा राजकीय नेत्याचा कार्यकर्ता असल्याचे समो...