भारत, एप्रिल 27 -- 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ता घर सोडून गेली होती. तिच्यावर कार्तिकने केलेल्या आरोपांवर सगळ्यांनी विश्वास ठेवला. सागरने देखील खोटे नाटक केले. पण त्याने मनात मुक्ताला सर्वांसमोर खरे असल्याचे सिद्ध करण्याचे ठरवले होते. पण सागरचे सर्वांसमोरचे वागणे पाहून माधवी आणि पुरुषोत्तम यांना देखील धक्का बसला होता. त्यांनी सागरला सुनावले होते. आता मालिकेत एक वेगळे वळण आले आहे.

'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही सागर मुक्ताला घरी घेऊन येताना होते. तो संपूर्ण घरात साजावट करतो. त्यानंतर मुक्ताच्या येण्याची जोरदार तयारी केली. ती पाहून स्वाती आणि इंद्राला धक्का बसतो. जर मुक्ता या घरात राहणार असेल तर मी या घरात राहू शकत नाही असे स्वाती सर्वांसमोर सांगते. ते ऐकून मुक्ता स्वत:च त्या घरातून बाहेर जाणार असल्याचे सांगते.वाचा:...