Pune, मार्च 19 -- पुणे : मेक इन इंडियाअंतर्गत स्कोडा आँटो वोक्सवॅगन इंडिया कंपनीने पुण्यातील चाकण प्रकल्पातून अंदाजे ५ लाख इंजिन उत्पादनाचा टप्पा पार केला आहे. यामुळे देशातील तसेच जागतिक बाजारपेठांना पाँवरट्रेन सोल्यूशनचा पुरवठा अधिक जलदगतीने होण्यास मदत होणार आहे.

या महत्त्वाच्या टप्प्याविषयी बोलताना स्कोडा आँटोच्या उत्पादन आणि लाँजिस्टिकचे संचालक सदस्य अँड्रियास डिक म्हणाले की, पुण्याच्या चाकण प्रकल्पातून ५ लाख इंजिन उत्पादन कंपनीने केले आहे. यामुळे यामुळे आमच्या जागतिक उत्पादन नेटवर्कमध्ये भारताची भूमिका अधिक मजबूत झाली आहे. टेक्नॉलॉजी आणि कार्यबल विकास यामध्ये आम्ही केलेल्या गुंतवणुकीमुळे आमची उत्पादन क्षमता वाढत आहे. परिणामी दर्जेदार आणि किफायतशिर पॉवरट्रेन्सचे उत्पादन होत आहे. भारतातील प्रगत उत्पादन ईकोसिस्टम आणि कुशल कार्यबल यांची...