Delhi, फेब्रुवारी 18 -- Qatar Amir Al Thani Net Worth: कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. भारत आणि कतारमधील राजनैतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून अल-थानी भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान मोदी हे प्रोटोकॉल तोडून विमानतळावर पोहोचले असून थानी यांचे त्यांनी जंगी स्वागत केले. अल-थानी यांची संपत्ती कुबेरपेक्षा कमी नाही. त्यांच्याकडे १०० खोल्यांचा सोन्याचा महाल आहे. या महालात ५०० वाहनांसाठी पार्किंगची सोय आहे. या सोबतच थानी यांच्या कडे फुटबॉल क्लब आणि स्वत:ची खासगी विमानसेवा आहे. तर ३००० कोटींची स्वत:ची यॉट देखील आहे.

शेख तमीम मार्च २०१५ पासून भारत दौऱ्यावर आले आहेत. १८ फेब्रुवारी ला राष्ट्रपती भवनात त्यांचे औपचार...