Mumbai, फेब्रुवारी 3 -- Real Estate News : 'स्क्वेअरयार्ड'ला मिळालेल्या मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, सोनाक्षी सिन्हाने मुंबईतील वांद्रे परिसरातील आपला फ्लॅट २२.५० कोटी रुपयांना विकला आहे. मार्च २०२० मध्ये तिने १४ कोटी रुपयांना हा फ्लॅट खरेदी केला होता, तेव्हापासून त्याच्या मूल्यात ६१ टक्के वाढ झाली आहे.

सोनाक्षी सिन्हाने विकलेला फ्लॅट वांद्रे पश्चिमयेथील ८१ ऑरिएटच्या १६ व्या मजल्यावर आहे. स्क्वेअरयार्ड्सने दिलेल्या माहितीनुसार, सिन्हा यांच्याकडे याच प्रकल्पात आणखी एक फ्लॅट आहे.

४.४८ एकरमध्ये पसरलेल्या या प्रकल्पात ४ बीएचके अपार्टमेंट आहेत. कागदपत्रांनुसार, सिन्हा यांनी विकलेल्या फ्लॅटचे कार्पेट एरिया 4,211 चौरस फूट आणि बिल्ट-अप एरिया 4,632 स्क्वेअर फूट आहे.

३१ जानेवारी २०२५ रोजी या व्यवहाराची नोंदणी करण्यात आली असून १ कोटी ३५ ल...