Mumbai, जानेवारी 28 -- Saif Ali Khan Case: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून आता त्याच्याशी संबंधित एका महिलेला देखील अटक करण्यात आली आहे. या महिलेला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे. सोमवारी पोलिसांनी या महिलेची चौकशी देखील केली आहे. सैफवर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या शरीफुल इस्लामयाने वापरलेले सिमकार्ड या महिलेच्या नावावर असल्याचे सांगितले जात आहे.

ज्या महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे, ती पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. या महिलेची चौकशी करण्यासाठी पोलिस छपरा आणि नादियामधील झिटकाफोटा येथील बराह अंदुलिया गावात पोहोचले. येथून या महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे. चौकशीदरम्यान महिलेने पोलिसांना सांगितले की, तीन वर्षांपूर्वी कोलकात्याच्या प्रवासादरम्यान तिचा मोबाइल हरवला होता.

कृष्णानगरचे अति...