Mumbai, जानेवारी 26 -- Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात आता नवे वळण आले आहे. सैफवर चाकू हल्ला केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या शरीफुल इस्लाम शहजाद या बांगलादेशी नागरिकाच्या बोटांचे ठसे घटनास्थळावर सापडलेल्या खुणांशी जुळत नाहीत. राज्य सीआयडीने शरीफुल इस्लामच्या फिंगरप्रिंट नमुन्यांचा निगेटिव्ह अहवाल सादर केला आहे. अशा तऱ्हेने मुंबई पोलिसांसाठी हा मोठा धक्का मानला जात असून खरा हल्लेखोर शरीफुल इस्लाम आहे की आणखी कोणी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

१६ जानेवारी रोजी सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी घटनेच्या ७२ तासांनंतर पोलिसांनी शरीफुल इस्लामला अटक केली होती. चोरीच्या उद्देशाने तो सैफच्या घरात घुसला होता आणि नंतर त्याने अभिनेत्यावर चाकूने हल्ला केल्याचा पोलिसांचा दावा आहे. घटनास्...