Mumbai, मार्च 26 -- स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याने बुधवारी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात तो एका गाण्याच्या माध्यमातून अर्थमंत्र्यांना 'निर्मला ताई' म्हणत आहे आणि धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद चिघळला असतानाच कामराचा दुसरा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

दीड मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये कामरा गंमतीने म्हणतो,

''आपका टैक्स का पैसा हो रहा है हवा हवाई।

इन सड़कों की बर्बादी करने सरकार है आई।

मेट्रो है इनके मन में खोद कर कर लें अंगड़ाई।

ट्रैफिक बढ़ाने ये है आई, ब्रिजेस गिराने ये है आई।

कहते हैं इसको तानाशाही।'

तो पुढे म्हणाले, "... सरकारसोबत देशात एवढी महागाई आली आहे. साडी वाली...