Delhi, फेब्रुवारी 19 -- consumer forum fined theatre for advertisements : गरजेपेक्षा जास्त काळ चित्रपटगृहात जाहिराती दाखवल्याने पीव्हीआर सिनेमा आणि पीव्हीआर आयनॉक्सला (आता पीव्हीआर) ग्राहकमंचाने मोठा दणका दिला आहे. या दोन्ही चित्रपट गृहांना १ लाखरुपयांहून अधिक दंड ठोठावला आहे. मंचाने चित्रपटगृहाल फटकारले देखील आहे. प्रत्येकाचा वेळ महत्त्वाचा आहे आणि या युगात वेळ हा पैसा आहे, असेही ग्राहक मंचाने म्हटले आहे.

ग्राहक मंचाने १५ फेब्रुवारी रोजी पीव्हीआर सिनेमा आणि पीव्हीआर आयनॉक्सला १.२८ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. जाहिरात्रीमुळे त्रस्त झालेल्या व्यक्तीला २० हजार रुपये, तर तक्रारदाराला आठ हजार रुपये आणि ग्राहक कल्याण निधीला १ लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, २६ जानेवारी २०२३ रोजी अभिषेक एमआर हे त्यांच्या कुट...