Mumbai, मार्च 20 -- Mumbai indians anthem song for IPL 2025 : आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाने आज गुरुवारी (२० मार्च) त्यांचे अँथम सॉंन्ग रिलीज केले. यामध्ये 'मैं नहीं तो कौन बे' मधून प्रसिद्ध झालेल्या सृष्टी तावडे हिने तिचा आवाज दिला आहे तर बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ हाही यात दिसत आहे.

या गाण्यात जॅकी श्रॉफ आणि रोहित शर्मा धमाकेदार एन्ट्री करताना दिसत आहेत. या गाण्याची मुख्य ओळ'प्ले लाइक मुंबई,' आहे.

मुंबई इंडियन्स संघ आयपीएल २०२५ मध्ये पहिला सामना २३ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळणार आहे. रविवारी होणारा हा सामना दुहेरी हेडरचा दुसरा सामना असेल, जो एमए चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल.

हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. तो रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचा सामना खेळू शकणार नाही. संघाने...