भारत, एप्रिल 17 -- आयपीएलच्या १८ व्या हंगामात पंच सातत्याने सामन्यांमध्ये फलंदाजांच्या बॅटचा आकार तपासत असतात. पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मंगळवारी झालेल्या सामन्यात अष्टपैलू सुनील नरेनची बॅट चाचणीत अपयशी ठरल्यानंतर अंपायरने त्याला तात्काळ बॅट बदलण्यास सांगितले. क्रिकेटमध्ये बॅटच्या आकारासंदर्भातील नियमात अनेक बदल करण्यात आले आहेत. बॅटच्या नियमात सर्वात प्रसिद्ध बदल १९७९ मध्ये दिसून आला, जेव्हा माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेनिस लिली ने अॅल्युमिनियम बॅटचा वापर केला, त्यानंतर नियम बदलून केवळ लाकडी बॅटचा वापर अनिवार्य करण्यात आला.

गेल्या काही वर्षांपासून खेळाडू आपल्या किट बॅगमध्ये एकापेक्षा जास्त बॅट घेऊन जात आहेत आणि बहुतेक बॅट वेगवेगळ्या वजनाच्या आणि आकाराच्या असतात. नियमानुसार बॅटचे वजन वेगवेगळे असू शकते, पण त्याची लां...