USA, फेब्रुवारी 15 -- अखेर ही प्रतीक्षा करण्याची वेळ संपणार आहे! अनेकजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता संपुष्टात आला आहे. अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांच्या पुनरागमनाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) आठ महिने प्रवास केल्यानंतर सुनिता आणि तिचा साथीदार बुच विल्मोर पृथ्वीकडे रवाना होणार आहेत. पण हा प्रवास इतका सोपा असणार नाही. सुनीता विल्यम्स यांच्यासमोर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीशी पुन्हा जुळवून घेण्याचे सर्वात मोठे आव्हान असेल. बराच वेळ वजनविरहित वातावरणात राहिल्यानंतर गुरुत्वाकर्षणाचा शरीरावर होणारा परिणाम एखाद्या धक्क्यासारखा असेल.

बुच विल्मोर स्वत: म्हणाले, "गुरुत्वाकर्षण खूप कठीण आहे. परत आल्यावर ते आम्हाला खाली खेचायला लागते. शरीरातील द्रव पदार्थ खाली जाऊ लागतात आणि पेन्सिल उचलणे...