Mumbai, जानेवारी 29 -- Siddhivinayak Temple Dress Code : मुंबईतील प्रसिद्ध व गणेशभक्तांचे आराध्यदैवत असलेल्या सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टने मोठा निर्णय घेतला आहे. सिद्धिविनायक मंदिरात पुढील आठवड्यापासून ड्रेस कोड लागू केला जाणार आहे. त्यामुळे मंदिरात अर्धवट आणि तोकडे कपडे घालून येणाऱ्यांवर बंदी घातली जाणार आहे.

मंदिरात शॉर्ट स्कर्ट किंवा शॉर्ट ड्रेस परिधान करून आल्यास अशा भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या ड्रेसकोडमध्ये ही माहिती देण्यात आली. सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने (एसएसजीटीटी) सांगितले की, सिद्धीविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांना आता भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले पाहिजे तरच त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. सिद्धीविनायक मंदिरातील प्रवेशासाठीचा हा ड्रेसकोड ...