UP, एप्रिल 17 -- सासूकडून होणारा सुनेचा छळ तुम्ही अनेकदा ऐकला आणि पाहिला असेल. पण अलीकडेच अलाहाबाद उच्च न्यायालयात एक खटला दाखल करण्यात आला ज्यात एका सासूने आपल्या सुनेविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली आहे. या प्रकरणी सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान असा ही प्रश्न उपस्थित झाला की, सासू आपल्या सुनेवर असा गुन्हा दाखल करू शकते का? त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने उत्तर दिलं आहे.

घरगुती हिंसाचार कायदा, २००५ अन्वये सासू आपल्या सुनेविरोधात तक्रार दाखल करू शकते, असे उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे. न्यायमूर्ती आलोक माथुर यांनी हा निकाल दिला आणि लखनौच्या कनिष्ठ न्यायालयाने सून आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात बजावलेले समन्स कायम ठेवले.

'स्मृती गरिमा आणि इतर विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार' या नावाने हा खटला दाखल करण्यात आला हो...