सांगली, जानेवारी 30 -- GBS outbreak Sangli : पुण्यात गुलेन बॅरे सिड्रोम आजार पाय पसरत आहे. या दुर्मिळ जीबीएस आजाराने पुण्यात थैमान घातले आहे. पुनयानंतर कोल्हापूरात या आजाराचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता जीबीएसने सांगलीतदेखील शिरकाव केला आहे. सांगलीत गुरुवारी जीबीएसबाधित ३ रुग्ण आढळून आले असून जिल्हयातील रुग्णसंख्या ६ वर पोहोचली आहे. त्यांच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून नागरिकांनी घाबरू नये तसेच योग्य काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

सांगलीत एक तर ग्रामीण भागात ५ असे ६ गुलेन बॅरी सिंड्रोम बाधित रुग्ण अढळले आहेत. हे रुग्ण आष्टा (ता.वाळवा), विटा (खानापूर) व नेलकरंजी (आटपाडी) येथील आहेत. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हे रुग्ण सापडल्यामुळे आरोग्...