Bengaluru, फेब्रुवारी 13 -- Bengaluru Crime News : सतत मोबाईल वापराला विरोध केल्यामुळं संतापलेल्या एका शाळकरी मुलीनं इमारतीच्या २० व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. बेंगळुरूच्या वेशीवर असलेल्या कडुगोडी इथं ही घटना घडली आहे.

इंडो-एशियन न्यूज सर्व्हिसनं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. अवंतिका चौरसिया असं मृत मुलीचं नाव असून ती दहावीत शिकत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचं कुटुंब मध्य प्रदेशातील होतं.

मृत मुलीचे वडील इंजिनीअर आणि आई गृहिणी आहे. ही मुलगी खासगी शाळेत शिकत होती आणि परीक्षेत तिला कमी गुण मिळाले होते. १५ फेब्रुवारीपासून वार्षिक परीक्षा सुरू होणार असल्यानं आई-वडील चिंतेत होते. परीक्षा जवळ येऊनही ती सतत मोबाईलवर वेळ घालवायची. त्यामुळं आई तिच्यावर चिडायची. मोबाईल वापराला तिनं विरोध केला होता. त्यामुळं चिडलेल्य...