भारत, एप्रिल 14 -- सायंट लिमिटेडबद्दल मोठी बातमी आहे. कंपनीने एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, त्यांना जॉइंट व्हेंचरमध्ये मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. नॉर्वेतील बोडो येथे हायड्रोजन उत्पादन व वितरण केंद्र उभारण्याचे काम मिळाल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीला हे काम संयुक्त उपक्रमात मिळाले आहे. सायंट लिमिटेडने ग्रीनएच आणि लक्सकारा यांच्या संयुक्त उपक्रमात हा प्रकल्प जिंकला आहे. कंपनी दीर्घकालीन कराराद्वारे हरित हायड्रोजन इंधन तयार करते.

आता ही बातमी आल्यानंतर सोमवारी कंपनीच्या शेअर्सवर लक्ष असणार आहे. याआधी शुक्रवारी बीएसईवर कंपनीचा शेअर ११४४.९५ रुपयांवर बंद झाला होता.

ग्रीनएच ही नॉर्वेजियन कंपनी आहे. नवीकरणीय ऊर्जेपासून हरित हायड्रोजनचे वितरण आणि उत्पादनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे हे कंपनीचे काम आहे. तर लक्सकारा ही जर्मन म...