Satara, फेब्रुवारी 17 -- वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी सातारा जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने अशी अनोखी शक्कल लढवली की, त्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. रस्त्यावरील प्रचंड वाहतूक कोंडी टाळण्यासाठी समर्थ महांगडे नावाच्या विद्यार्थ्याने आपल्या दुकानापासून १५ किलोमीटरचा प्रवास पॅराग्लायडिंगने अवघ्या १५ ते २० मिनिटांत पूर्ण केला. झालं असं की, परीक्षा केंद्रावर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला पाहिलं नाही तेव्हा त्यांनी त्याला फोन करून का आला नाही, अशी विचारणा केली.

त्यावेळी समर्थ हा B.Com प्रथम वर्षाचा विद्यार्थी पाचगणी येथे होता, तेथे त्याचे ज्यूस विक्रीचे दुकान आहे. त्याच्या मित्रांनी त्याला फोन करून पसारणी येथील परीक्षा केंद्रावर का आला नाही, अशी विचारणा केली. रस्त्यावरील वाहतूक कोंडीत अडकण्याची भीती असल्याने त्याने परीक्षा केंद्राव...