Kerala, फेब्रुवारी 20 -- केरळमधील एका कॅथलिक शाळेच्या हलगर्जीपणाचा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोझिकोड जिल्ह्यातील शाळा प्रशासनाने तेथे काम करणाऱ्या एका शिक्षिकेला तब्बल सहा वर्षांपासून पगार दिला नाही. ज्यानंतर या महिलेने कंटाळून आत्महत्या केली. एलिना बेनी (२९) असे पीडित शिक्षिकेचे नाव असून ती कोझिकोड जिल्ह्यातील कोडेन्चेरी येथील सेंट जोसेफ लोअर प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षिका होती. बुधवारी दुपारी ती घरात मृतावस्थेत आढळली, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली.

हे प्रकरण समोर आल्यानंतर केरळच्या शिक्षणमंत्र्यांनीही याची दखल घेतली आहे. शिक्षणमंत्री व्ही शिवनकुट्टी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे म्हटले आहे. तर अलिनाच्या वडिलांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या मृत्यूला शाळा प्रशासन जबाबदार असल्याचे...