Lucknow, मे 12 -- बॉलिवूड अभिनेता सलमान खान (salman khan) याच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. सलमानला पाहण्यासाठी चाहते मोठी गर्दी करतात. सलमान येणार असेल त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवावा लागतो. नाहीतर गोंधळाची स्थिती निर्माण होते. लखनऊमध्ये असंच काहीसं घडलंय पण ते खऱ्या सलमानला पाहण्यासाठी नाही तर खोट्या सलमानला पाहण्यासाठी. लखनऊमध्ये एक व्यक्ती स्वतःला सलमानचा डुप्लिकेट म्हणवून घेतो. त्याचे सोशल मीडियावर फॉलोवर्सदेखील आहेत. मात्र त्याच्या वागण्यामुळे तिथे अशी परिस्थिती निर्माण झाली की पोलिसांना त्याला अटक करावी लागली.

डुप्लिकेट सलमान हा सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. त्याच्या फॉलोवर्सची संख्या देखील लाखोंमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या मनोरंजनासाठी तो वारंवार रिल्स बनवत असतो. कधी तो अर्धनग्न अवस्थेत रिल्स बनवतो तर कधी सिगारेट प...