Mumbai, मे 22 -- बॉलिवूडचा भाईजान असलेला सलमान खान (salman khan) याचा 'कभी ईद कभी दिवाली' (kabhi eid kabhi diwali) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच सलमानने या चित्रपटातील त्याचा लूक चाहत्यांसोबत शेअर केला होता. त्यानंतर अभिनेत्री पूजा हेगडे हिने देखील हटके अंदाजात चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं. शेहनाज गिल देखील चित्रपटाच्या सेटवर दिसली होती. चित्रपटाचं चित्रीकरणही सुरू झालं होतं. सलमानच्या बहिणीचा नवरा आणि अभिनेता आयुष शर्मा (aayush sharma) देखील या चित्रपटात काम करणार होता. मात्र आता आयुषने एक दिवसाचं चित्रीकरण करून चित्रपटाला रामराम केल्याचं समजतंय.

आयुष आणि अभिनेता जहीर इकबाल दोघेही या चित्रपटात काम करणार होते. त्यांनी या चित्रपटासाठी एका दिवसाचं चित्रीकरण देखील पूर्ण केलं होतं. मात्र सुरुवातीपासूनच आयुषचा प्रो...