New delhi, एप्रिल 12 -- आयपीएल २०२५ चा हंगाम चेन्नई सुपर किंग्जसाठी अत्यंत निराशाजनक ठरला आहे. ५ वेळा चॅम्पियन असलेल्या या संघाने आतापर्यंत ६ सामने खेळले असून त्यापैकी सलग ५ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच संघाने सलग इतके सामने गमावले आहेत. विशेष म्हणजे ५ पैकी ३ पराभव चेपॉकच्या बालेकिल्ल्यात झाले आहेत. एमए चिदंबरम स्टेडियमवर सीएसकेने पराभवाची हॅटट्रिक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कर्णधार ऋतुराज गायकवाड स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर नवीन कर्णधार एमएस धोनीमुळे सीएसकेचे नशीब पालटेल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. शुक्रवारी, ११ एप्रिल रोजी केकेआरविरुद्ध त्यांना ८ गडी राखून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. मात्र, या पराभवानंतरही त्यांना प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची संधी आहे. जाणून...