New delhi, मार्च 5 -- सलग ५८ तास ३५ मिनिटे चुंबन घेण्याचा विश्वविक्रम करणाऱ्या पती-पत्नीचा घटस्फोटही झाला आहे. थाई जोडप्याने स्वतःहून विभक्त होण्याची घोषणा केली. २०१३ मध्ये एकचाई आणि लक्षणा तिरानारत यांनी सर्वात दीर्घकाळ चुंबनाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता. हे काम अजिबात सोपं नव्हतं. यासाठी ते २ दिवसांपेक्षा जास्त वेळ न झोपता उभे राहिले होते. त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि सतत किस केले. मात्र आता त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांची निराशा झाली आहे. इंटरनेट वापरकर्त्यांनी कमेंट करत आश्चर्य व्यक्त केले आहे.

थायलंडच्या या जोडप्याने त्यांच्या विभक्त होण्याच्या कारणांबद्दल अद्याप काहीही सांगितले नाही. मात्र, कालांतराने ते हळूहळू एकमेकांपासून दूर गेल्याची कबुली त्यांनी दिली. पॉडकास्टमध्ये एकचाई म्हणाले, "जड अंतःकरणाने आम्ही आमच्या...