New delhi, फेब्रुवारी 3 -- लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी चीन प्रश्नावरून मोदी सरकारला चांगलेच कोंडीत पकडले. राहुल गांधी म्हणाले की, डेटावर चीनचे नियंत्रण आहे, म्हणूनच तो आपल्या सीमेत घुसण्याचे धाडस करत आहे. 'इंडिया आघाडीचा फोकस काय आहे, हे मला इथे मांडायचे आहे. या देशाचे भवितव्य देशातील तरुण ठरवतील. अशा वेळी मला जे काही बोलायचे आहे, ते लक्षात घेऊनच सांगावे लागेल. मला जे सांगायचे आहे, ते पंतप्रधान मोदीही मान्य करतील, असे मला वाटते. आपण वाढलो आहोत, वेगाने वाढत आहोत. आपण हळूहळू वाढत असू, पण आपण वाढत आहोत. पण खरी गोष्ट म्हणजे आपण बेरोजगारीवर मात करू शकलेलो नाही. भारतातील तरुणांच्या रोजगाराबाबत ना यूपीए सरकार योग्य आणि स्पष्ट उत्तर देऊ शकले, ना एनडीए सरकार.

राहुल गांधी म्हणाले, 'पंतप्रधानांच्या काही गोष्ट...