Mumbai, जानेवारी 28 -- UCC in Uttarakhand: उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा सोमवारपासून (२७ जानेवारी २०२५) लागू झाल्याची उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी घोषणा केली. हा कायदा लागू करणारे उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. विवाह, घटस्फोट आणि लिव्ह-इन रिलेशनशिपच्या अनिवार्य ऑनलाइन नोंदणीसाठी एक पोर्टल सुरू करून यूसीसीची अधिकृत सुरुवात करण्यात आली.

पुष्करसिंह धामी यांचे शासकीय निवासस्थान मुख्यमंत्री सेवक सदन येथे झालेल्या या कार्यक्रमाला त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्व धर्मातील प्रत्येक नागरिकासाठी समान कायदे तयार करणारा यूसीसी सध्या पूर्णपणे अंमलात आला आहे. याचे संपूर्ण श्रेय राज्यातील जनतेला जाते, असे धामी यांनी यावेळी सांगितले.

-अनुसूचित जमाती आणि संरक्षित प्राधिकरण-अधिकार प्राप्त व्य...