Mumbai, फेब्रुवारी 11 -- रणवीर अलाहाबादीच्या अश्लिल कमेंटवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कॉमेडियन समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लॅटेंट' चांगलाच अडचणीत आला आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी ''इंडियाज गॉट लॅटेंट'' या मालिकेचे निर्माते समय रैना आणि इतर अनेकांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. मालिकेच्या पहिल्या भागापासून सहाव्या भागापर्यंतचे सर्व होस्ट आणि गेस्ट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सायबर सेलने ''इंडियाज गॉट लॅटेंट' या युट्युब शोविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकूण ३० ते ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालिकेच्या पहिल्या एपिसोडपासून ते एपिसोड ६ पर्यंत यात सहभागी असलेल्या सर्व लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांना नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सर्वांना जबाब नोंदवण्यासाठी बोलाव...