भारत, फेब्रुवारी 13 -- दक्षिणेकडील सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा, अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रूथ प्रभूच्या घटस्फोटाबाबत एक खुलासा समोर आला आहे. समंथापासून घटस्फोट घेण्यासाठी त्याची दुसरी पत्नी सोभिता धुलिपाला कारणीभूत होती, अशा चर्चा होत्या. परंतु 'रॉ टॉक्स विथ व्हीके पॉडकास्ट'मध्ये एका मुलाखतीत नाग चैतन्यने यावर खुलासा केला आहे. सोभिता धुलिपाला सोबतचे नुकतेच झालेले लग्न आणि त्यापूर्वी समंथा रूथ प्रभूपासून घेतलेला घटस्फोटाबद्दल त्याने मोकळेपणाने सांगितले आहे. सोभिताचा सामंथासोबतचे माझे आधीचे लग्न मोडण्याशी सोभिताचा काहीही संबंध नव्हता, त्या केवळ अफवा आहेत असं नाग चैतन्य म्हणाला.

नागा चैतन्य म्हणाला, 'या प्रकरणात सोभिताला ओढले जात असल्याबद्दल मला वाईट वाटते. तिचा याच्याशी काहीही संबंध नाही आणि तिचा काहीही दोष नाही. ती अतिशय नैस...