भारत, एप्रिल 18 -- पुणे :'सन मराठी'वर येत्या २१ एप्रिल पासून दररोज सायंकाळी ७ वाजता 'हुकुमाची राणी ही' मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'हुकुमाची राणी ही' या मालिकेतील नायक - नायिकेची गोष्ट ही फॅक्टरी मधूनच सुरु होणार आहे. मालिकेचं शूटिंगही खऱ्या फॅक्टरीमध्ये होत आहे. बरेचदा मालिकांमध्ये ऑफिस, फॅक्टरी या ठिकाणांसाठी सेट उभारला जातो. पण या मालिकेचं शूटिंग साताऱ्यामधील खऱ्या फॅक्टरी मध्ये पार पडणार आहे. या मालिकेच्या टीमसाठी ही एक आव्हानात्मक बाब असणार आहे.

मालिकेत अभिनेत्री वैभवी चव्हाण ही राणीची भूमिका तर इंद्रजीतची भूमिका अक्षय पाटील साकारत आहे. या दोघांबरोबरच अभिनेत्री अंकिता पनवेलकर,अभिनेते राहुल मेहंदळेंसह आणखी बरेच दिग्गज कलाकारही मालिकेत महत्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. मालिकेत राहुल मेहंदळे हे जयसिंगराव महाडिक या म...