भारत, मे 13 -- एक पॉर्नस्टार म्हणून करिअरला सुरुवात करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. (Sunny leone) आज प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये तिचे नाव घेतले जाते. पण सनीचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. सुरुवातीला तिने अनेक अडल्ट चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर सनी भारतात आली आणि तिचे 'बेबी डॉल' हे गाणे हिट ठरले. या गाण्याने सनीचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. आज १३ मे रोजी सनीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने चला जाणून घेऊया तिच्या एकूण संपत्ती विषयी.

सनी लिओनी 'बिग बॉस'च्या पाचव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यावेळी तिचा चेहरा अनेकांसाठी नवा होता. पण सनीने बिग बॉसच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली होती. आज सनी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती आयटम साँग किंवा चित्रपटांसाठी तगडे मानधन घेते. तिच्या एकूण स...