Mumbai, फेब्रुवारी 11 -- महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीत काहीतरी बिनसल्याच्या तसेच महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजीच्या बातम्या समोर येत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे गटातील नेत्यांसोबत दोन बैठका घेऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली तर सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे तीन नेते मिलिंद नार्वेकर, माजी मंत्री सुभाष देसाई आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना आपल्या निवासस्थानी बोलावून चर्चा केली.

राजकीय जाणकार या बैठकांची वेळ महत्त्वाची मानत आहेत. उपमुख्यमंत्री एकन...